Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये VV-PAT मशीन वापरले जाणार नाहीत, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष यासाठी झटत आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगामी काळातील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळण्याची शक्यता आहे. असं असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खूप मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुका एकत्र होणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहेत. तसेत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संसस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. पण तरीही पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अद्याप निश्चित नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही, असे देखील संकेत राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. देशात राज्य निवडणूक आयोगाच्या अख्त्यारित ज्या निवडणुका होतात त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात नाही. कारण एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एका पेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
एखाद्या विधानसभा मतदारसंघात एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो, त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर केला जातो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ती पद्धत अधिकाधिक वेळकाढू होते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. दरम्यान, निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारेच होणार आहेत. तसेच या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान होतील, अशी देखील माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा