• Sat. Jun 6th, 2026

    Sanjay Raut : आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले, त्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत; संजय राऊतांची टीका

    Sanjay Raut : आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले, त्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत; संजय राऊतांची टीका

    Sanjay Raut on Devendra Fadnavis : खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत विधानसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करत केला. शिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांवर टीका करत विधानसभेत पैशांचं वाटप झाल्याचं सांगितलं. काँग्रेस माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपात एन्ट्री केल्याचं सांगताना, ज्यांनी ५० खोके एकदम ओके ही घोषणा केली, तेच आता भाजपात गेल्याचं म्हणत टीका केली.

    ‘५० खोके एकदम ओके या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल आहेत. विधानसभा सुरू असताना विधानभवनाच्या आवारात कैलास गोरंट्याल यांनी ५० खोके एकदम ओके ही घोषणा दिली होती आणि त्यानंतर ती अख्ख्या देशामध्ये पसरली. आता ते देवेंद्र फडणवीसांच्या पक्षात आहेत. त्यांनी काल असं सांगितलं आहे, की विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका-एका मतदारसंघात १०० कोटी खर्च केले. पोलिसांच्या सरकारी वाहनातून पैशांचं वाटप सुरू होतं. त्यानंतर गोरंट्याल म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते कुठे पुरे पडणार? त्यामुळे मला भाजपात यावं लागलं, असं ते म्हणाले आणि आज ते फडणवीसांच्या पक्षात आहेत.’

    ‘राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या जागेसाठी कशाप्रकारे हेराफेरी केली, त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी बोलायला हवं. राज्यात शेतकरी आत्महत्या होतात, बेरोजगारी आहे त्यावर त्यांनी बोलायला हवं. किती काळ फडणवीस उद्धव ठाकरे ंवर बोलून अडकून पडणार आहेत. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले आहेत. त्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत’, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा