• Sat. Mar 14th, 2026
    हॉटेलमध्ये गेले ते रुममधून बाहेरच आले नाहीत, शिक्षकाची लॉजमध्ये बॉडी; नांदेडमध्ये खळबळ

    Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात शिक्षक मृतावस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ते एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. सकाळी बराच वेळ होऊनही ते हॉटेलबाहेर पडले नाहीत. त्यानंतर वेटरला संशय आला आणि पुढे धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यात एका खाजगी संस्थेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा लॉजमध्ये मृतदेह आढळून आला. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटीजवळ हॉटेल स्वराज्य लॉजमध्ये शनिवारी सकाळी ही घटना उघडलीस आली. आशिष भाऊसाहेब शिंदे (रा. गुंटूर ता. कंधार) असं मृत शिक्षकाचं नाव आहे. शिक्षकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर विविध चर्चाना उधाण आलं होतं.

    नेमकं काय घडलं?

    अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात हॉटेल स्वराज फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉज आहे. आशिष भाऊसाहेब शिंदे हे शिक्षक त्या लॉजवर मुक्कामास होते. शनिवारी सकाळी शिंदे आपल्या रूममध्ये अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. सकाळपासून आशिष लॉजमधील रूमच्या बाहेर न आल्याने हॉटेल मालकाला संशय आला. वेटरने रूमचा दरवाजा खटखटावला, आवाज देखील लगावला, पण आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. आतून बराच वेळ होऊनही उत्तर न आल्याने शिक्षकाच्या रूमचा दरवाजा तोडण्यात आला. आतील दृष्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
    Pune Crime : साहेब, लवकर या! मित्राला स्वत: च संपवत पोलिसांना लावला फोन, पण बोलता-बोलता एक गोष्ट चुकला अन्… पुण्यातील हडपसरमध्ये खळबळ

    दरवाजा तोडताच समोर धक्कादायक दृष्य

    दरवाजा तोडताच आशिष शिंदे यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हॉटेलच्या व्यवस्थापनाने तात्काळ अर्धापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार भिमराव राठोड, राजेश गुट्टलवाड, अरूण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिक्षक आशिष‌ शिंदे यांना रुग्णवाहिकेने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी शिंदे यांना मृत घोषित केलं.

    Pune crime news | कोंढवा परिसरात धक्कादायक घटना; डिलिव्हरी बॉयकडून दिवसाढवळ्या तरुणीवर अत्याचार

    शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात

    आशिष भाऊसाहेब शिंदे हे खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. १ ऑगस्ट शुक्रवारी रोजी रात्री लॉजमध्ये मुक्कामी होते. शवविच्छेदन शासकीय रुग्नालयात दाखल करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शिक्षकाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा