Local Train : लोकलमधून प्रवास करताना महिला डब्यांमध्ये दरवाजात उभं मार्ग रोखणाऱ्या महिला प्रवाशांमुळे अनेकांना पुढच्या स्थानकात चढताना मोठा त्रास सहन करावा लागतो.. बदलापूर, कर्जत लोकलमध्ये हा प्रकार अधिक असून रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटना करत आहेत.
लोकलमधील गर्दीचा त्रास टाळण्यासाठी अनेक प्रवासी दरवाजावर उभे राहून प्रवास करतात. आपले स्थानक आल्यास गर्दीच्या रेट्यातून सहजपणे बाहेर पडणे, हा उद्देशही दरवाजावर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांचा असतो. बहुतेकांची कामावर जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी एक विशिष्ट लोकल ठरलेली असते. लोकलमधील खिडकीजवळची आसने, दरवाजालगतची आसने आणि दरवाजावर उभे राहण्याच्या जागाही अनेकांच्या निश्चित असतात. मात्र काही जण प्रवास करताना आपल्याला पुरेशी जागा मिळावी, यासाठी लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात.
Mumbai BEST Bus: 95 टक्के बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाच्या बाजूने कौल; ७ ऑगस्टच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार
सकाळच्या वेळेत पश्चिम रेल्वेवर विरार, डहाणू रोड, बोरिवलीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या आणि मध्य रेल्वेवर कर्जत, कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील पुरुषांच्या डब्यात या दार अडवणाऱ्यांचा त्रास कायम असताना आता महिला डब्यातही हा प्रकार सुरू झाला आहे. ‘विशेषतः बदलापूर, डोंबिवली, कल्याण, दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे डब्यात प्रवेश करताना धक्काबुक्की करावी लागते. परिणामी, डब्यात प्रवेश केल्यावर नव्या वादाला तोंड फुटते,’ अशी प्रतिक्रिया डोंबिवलीतील महिला प्रवासी रोहिणी देशपांडे यांनी दिली.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या; रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक, मेगा’हाल’ टाळण्यासाठी A टू Z जाणून घ्या
महिला डब्यात सकाळच्या वेळेत कर्जत, कसाऱ्यावरून सुटणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, दिवा स्थानकांत या महिला दार अडवून उभे असतात. परतीच्या प्रवासात कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, भांडुप स्थानकांत प्रवाशांची वाट अडवली जाते. ‘डब्यांतील वाट अडवल्याने महिलांवर दरवाजात लटकत प्रवास करण्याची वेळ येते. गर्दीचा रेटा, प्रवाशांमधील भांडणे, पकड निसटणे यांमुळे प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडतात. त्यामुळे अशा महिलांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे आहेच, शिवाय महिला प्रवाशांनी स्वयंशिस्तीचे पालन केल्यास अशा घटनांवर पूर्ण आळा घालणे शक्य होणार आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.
ट्रेनमध्ये हेल्मेट घालून विद्यार्थ्यांचा प्रवास; ‘हे’ होतं खरं कारण
सातत्यपूर्ण मोहिमेची गरज
महामुंबईत स्वस्त आणि जलद प्रवासासाठी मुंबई लोकल हा एकमेव पर्याय आहे. शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक सार्वजनिक वाहतूक लोकलच्या माध्यमातून पूर्ण होते. शहरे विस्तारित होत गेली तरी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा पर्याय नसल्याने लोकलमध्ये गर्दी वाढत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत लोकल डब्यांत प्रचंड गर्दी असते. यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकलचे दार अडवणाऱ्यांविरोधात सातत्यपूर्ण मोहीम राबवून कारवाई केल्यानंतरच महिला प्रवाशांच्या अडचणी कमी होणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

