Pune Yavat Mob Violence Update : यवतमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. यातच मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणातील १७ आरोपींनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दौंडमधील यवत गावात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी (एसआरपीएफ) तैनात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तर १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३० जणांची ओळख पटविण्यात आली आहे, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.
Pune Yavat : पुण्यातील यवतमध्ये तणावपूर्ण शांतता, दुकानं-बाजारपेठ बंद; परिस्थिती नियंत्रणात, जमावबंदी लागू
आरोपीला पाच ऑगस्टपर्यंत कोठडी
शुक्रवारी सकाळी एका तरुणाने मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षाच्या महाराजाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला, असं एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. हे निमित्त साधून ही संपूर्ण शहरात दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्याचे सांगितलं जात आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर यवत गावात तणाव निर्माण झाला. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलिसंनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. तरुणाला शनिवारी दौंड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी तरुणाला पाच ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.तर दुसरीकडे यवतमध्ये तणाव वाढण्यास चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचा प्रकारही कारणीभूत ठरला. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. पण यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

