• Sat. Mar 7th, 2026

    पुण्याच्या यवतमध्ये 2 गट भिडले, जोरदार दगडफेक; आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव, पोलिसांचा लाठीमार

    पुण्याच्या यवतमध्ये 2 गट भिडले, जोरदार दगडफेक; आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव, पोलिसांचा लाठीमार

    पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका आक्षेपार्ह व्हॉट्सऍप पोस्टमुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. यानंतर हाणामारी आणि दगडफेक झाली, जमावाने दुचाकी पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे: जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन गटांमध्ये हाणामारी, दगडफेक झाली आहे. जमावाकडून दुचाकी पेटवून देण्यात आल्या आहे. एका आक्षेपार्ह व्हॉट्स ऍप पोस्टमुळे तणाव निर्माण झाला. तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडण्यात आल्या. सध्याच्या घडीला यवममध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांकडून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

    पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गट एकमेकांना भिडले असून घरांना आगी लावण्याचा प्रयत्न झाला आहे. काही दुचाकी पेटवून देण्यात आले आहेत. दोन गटांमध्ये सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून तणाव नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. २६ जुलैपासूनच यवतमध्ये तणावाची स्थिती होती. त्याचा उद्रेक आज झाला. (सविस्तर वृत्त लवकरच)

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा