Latur News : लातूर जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे. नवऱ्याला मैत्रिणीसोबत फिरण्यावरुन पत्नीने जाब विचारल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवलं. यात विवाहितेच्या सासू आणि दिरानेही मदत केली. घटनेत महिला 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.
माझ्या मैत्रिणीला तू का फिरायला घेऊन गेलास? असं पत्नीने विचारतात पतीने आणि मैत्रिणीने मिळून विवाहित महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. यात महिला 70 टक्के भाजली असून आता ती मृत्यूच्या दारात उभी आहे.
Pune News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, प्रेमसंबंधातील वादातून तरुणीला मारहाण; कानाचे पडदे फाटले; पुण्यात खळबळ
पती आणि मैत्रिणीने आधी विवाहितेला जाळलं, नंतर सासू आणि दीर अशा चौघांनी संगनमताने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे घडली आहे. याप्रकरणी रेणापूर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Baramati News : बाईकवरुन वडील दोन चिमुकल्यांसह निघाले, वाटेत काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत, बारामतीत हळहळ
नेमकं काय घडलं?
फातिमा कुरेशीने दिलेल्या जबाबावरून गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पती तोफिक कुरेशी याला तू मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेलास असं विचारलं असता पती तोफिक कुरेशी याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि मैत्रीण हिना पठाण हिने काडी पेटवून अंगावर टाकली. नंतर सासू फैमून कुरेशीने दरवाजा बंद केला आणि दीर शफिक कुरेशी याने दरवाजा बाहेरून लावून घेतला. चौघांनी संगनमताने महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून पीडित महिला 70 टक्के भाजली आहे. पीडित महिलेस उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडित महिलेच्या जबाबवरून रेणापूर पोलिसांत पतीसह चौघांविरोधात गुन्हा रजिस्टर नं 282/ 2025 कलम 109, 3 (5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी करत आहेत.

