• Wed. Mar 11th, 2026
    माझी नार्को टेस्ट करा, गिरीश महाजन यांनी खडसेंचं चॅलेंज स्वीकारलं

    Girish Mahajan Slams Eknath Khadse : पुण्याच्या खराडी येथील हायप्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकर अटक झाल्याने खडसे टीकेचे धनी ठरत आहेत. यावरुन गिरीश महाजनांनी आता जोरदार प्रहार केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    निलेश पाटील, जळगाव : पुण्याच्या खराडी येथील हायप्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. खेवलकर हे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे पती आहेत. यामुळे आता एकनाथ खडसे राजकीय वर्तुळात टीकेचे धनी ठरत आहेत. हनीट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंच्या निशाण्यावर असणाऱ्या गिरीश महाजनांनी जोरदार प्रहार केला आहे. आपण ‘नार्को टेस्टसाठी तयार’ असल्याचे देखील महाजनांनी म्हटले आहे.

    गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसेंना माहिती झालं असेल की आपले जावई काय करतात, आता त्यांना अंदाज आला असेल. एकनाथ खडसे कायम विरोधात असतात, ते सहन करतच नाही. खरंच आहे एकनाथ खडसे कोणती गोष्ट सहन करत नाही, असा मिश्किल टोला मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला आहे.
    Supriya Sule : सुप्रिया सुळे रोहिणी खडसेंच्या बाजूने बोलल्या, ससून रुग्णलयाच्या रिपोर्टबाबतही केला मोठा दावा
    तर गिरीश महाजनांनी खडसेंना उद्देशून पुढे म्हटले की, त्यांनी मागणी केलीय नार्को टेस्टची मग करा ना, लोढांचीही करा आणि माझी पण करा. यांच्या वारंवार खोटं बोलण्याला अर्थ नाही. दोघांचीही नार्को टेस्ट करुन टाका.

    रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास करत आहे पार्टीच्या त्या स्पॉटवर कोकेन, गांजा, हुक्का वगैरे सगळं दिसत आहेत. पुरावे आहेत, या उपर कोणाला शंका असेल तर पोलीस सखोल तपास करतील, असेही गिरीश महाजनांनी नमूद केले आहे.

    एकनाथ खडसेंनी माझ्या संपत्तीबाबत माहिती काढावी मुंबई पुण्यात कुठे माझी संपत्ती आहे. आज ऑनलाईन सर्व मिळतं, मी त्यांना सर्व उतारे काढून देतो. पाच वेळा काय दहा वेळा माझ्या संपत्तीची चौकशी करावी. एकनाथ खडसेंच्या संपत्तीची चौकशी केल्यानंतर आपल्याला माहितीच असेल काय झाला आहे खडसे हा विषय मी सोडून दिलेला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा