Boat Accident in Raigad : रायगडच्या खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जण हे पोहोत समुद्र किनारी आल्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे. तर उर्वरित तिघांचा शोध सुरु आहे.
राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे समुद्राला देखील उधाण आलं आहे. त्याचाच फटका रायगडमध्ये बसला आहे. मुसळधार पावसासोबत समुद्राला उधाण आलं आहे. यामुळे एक बोट समुद्रात बुडाली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई नावाची बोट करंजा येथून सकाळी सात वाजता निघाली होती. बी बोट सकाळी जवळपास साडेआठ वाजण्याच्या सुमारास खंदेरी जवळपास पाण्यात पलटी होऊन बुडाली. त्यामध्ये असणाऱ्या आठ इसमापैकी 5 इसम पोहत बाहेर आलेले आहेत. यापैकी रोशन कोळी या तरुणाच्या डोक्याला जबर मार बसला. तर इतर जण किरकोळ जखमी आहेत. त्यांना अलिबागच्या सिविल हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेलं आहे. तर ड्रोनच्या मदतीने किनाऱ्याजवळ बाकी व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
बोटीवरील सुखरुप बचावलेले बोटीवरील खलाशी आणि तांडेल
1) हेमंत बळीराम गावंड , वय – 45 रा.आवरे ता. उरण
2) संदीप तुकाराम कोळी , वय – 38 रा. करंजा ता . उरण
3) रोशन भगवान कोळी वय – 39 रा. करंजा ता. उरण
4) शंकर हिरा भोईर वय – 64 रा. आपटा ता . पनवेल
5) कृष्णा राम भोईर वय – 55 रा. आपटा ता . पनवेल
तसेच अद्याप मिसिंग असलेल्या व्यक्तींची नावे:
1) नरेश राम शेलार
2) धीरज कोळी रा. कासवला पाडा उरण
3) मुकेश यशवंत पाटील

