Raigad News : नात्यातच प्रेमसंबंध असलेल्या तरुण तरुणीकडून आयुष्याचा डाव खेळला गेला. यात लग्नाआधीच तरुणी गर्भवती राहिली. आणि बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
आत्याच्या मुलासोबत प्रेम संबंध
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन पीडित मुलगी हिचे तिच्या अलिबाग येथे राहणाऱ्या आत्याच्या मुलासोबत प्रेम संबंध होते.आरोपीच्या मामाने म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न अठरा वर्षांनंतर करून देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे त्यांच्या विवाहामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नव्हती. या दरम्यान अलिबाग तालुक्यातील आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी येत जात असे.
Latur News : HIV बाधित अल्पवयीन मुलीवर वासनांध नराधमांचा अत्याचार, गर्भवती राहिली अन्… नामवंत संगोपन संस्थेतील धक्कादायक प्रकार समोर
अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली
पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपीने तिला, आपण दोघे लग्न करणार आहोत असे सांगून तिच्याबरोबर वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या शरीर संबंधातून अल्प वयीन पीडित मुलगी ही वीस आठवड्याची गर्भवती राहिली. अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिल्याचे समजताच दोघांनी एका मंदिरात जाऊन एकमेकांना हार परिधान करून एकत्रित राहू लागले.
Pune Crime : आरोपीला बचावाची संधी मिळायला हवी; पुण्यात चिमुकलीवर अत्याचार करुन संपवलं, फाशीची शिक्षा रद्द
गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक
अल्पवयीन पीडित मुलगी ही गर्भवती असल्याने तिच्या पोटात अचानक दुखू लागले. म्हणून तिला आई वडिलांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा गर्भपात झाल्याचे समजले.याबाबत अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडून पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठाण्यास माहिती देण्यात आली. सदर माहिती प्राप्त होताच वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब घेत गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे.

