Chhatrapati Sambhajinagar Accident : एका वर्षापूर्वी वडिलांनी यकृत प्रत्यारोपण करून वीस वर्षीय मुलीला जीवदान दिले होते. परंतु, एका दुर्घटनेत कुंभेफळ येथे रात्री अडीच वाजता अज्ञात ट्रकने स्कूटीला धडक दिल्याने विशाखा वंजारे या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
विशाखा विश्वास वंजारे (वय 20 रा. बीड) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सानवी शिंगारे राहणार बीड, अपेक्षा जमधडे राहणार गडचिरोली असे गंभीर जखमी झालेल्या तरुणींचे नाव आहे. या दोन्ही तरुणींवर खाजगीर कुणालाच उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की शेंद्रातील पीपल्स फॉरेन सिक्स सायन्स महाविद्यालयात या तरुणी शिक्षण घेत होत्या. महाविद्यालय या भागात असल्यामुळे त्यांनी कुंबेफळ परिसरातच खोली भाड्याने घेतली होती.
Chhatrapati Sambhajinagar: ग्राहकाचा गॅलरीतून इशारा अन् पोलिसांचा छापा, हॉटेलमध्ये भलतंच सुरु, सात महिलांची सुटका
रात्री काही मित्रांसमवेत चहा घेण्यासाठी त्या खोलीच्या बाहेर पडल्या होत्या. एक मित्र चहाच्या दुकानातून थांबला होता त्याच्याकडे ट्रिपल जात होत्या. याचवेळी समोरून एक चार चाकी वाहन आलं त्याने स्कुटीला हूल दिली. याचवेळी ओव्हरटेक करणाऱ्या ट्रक चालकाला कारच्या बाजूला असलेली स्कूटी दिसली नाही. या भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. या भीषण अपघातात तीनही तरुणी गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना मित्र आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी रुग्णालयात दाखल केले. यात विशाखाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर दोन तरुणींवर उपचार सुरू आहेत.
Chhatrapati Sambhajinagar : प्लॉट पाहण्यासाठी चाललेल्या विवाहितेच्या पाठीमागे धावत गेला, अन्… छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
वर्षभरापूर्वी वडिलांनी दिलं होतं लिव्हर
बीड येथील विशाखा वंजारे हिच लिव्हर निकामी झाल्याने गेल्यावर्षी वडिलांनी तिला लिव्हर दिले होते. यामुळे तिला जीवदान मिळालं होतं. विशाखाची प्रकृती स्थिर झाल्याने पालकांनी दिला पुढील शिक्षणासाठी विशाखा छत्रपती संभाजी नगर मध्ये आली. ती सध्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. वर्षभरापूर्वी जीवदान मिळालेल्या विशाखाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

