Kalyan News : कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे. मारहाण करणारा तरुण गोपाल झा ला अटक करण्यात आली आहे.
आरोपी गोकुळ झा सह चार जणांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. गोकुळचा भाऊ रणजीत झा ला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. मारहाण करणार हा रेकॉर्डवरचा आरोपी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी या फरार आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Kalyan : छातीत लाथ घातली, फरफटत नेलं, पीडिता कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडलीया घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. क्लिनिकच्या सीसीटिव्ही मध्ये ही घटना कैद झाली. आरोपी तरुणाने किती अमानुषपणे तरुणीला मारहाण केली हे दिसत आहे. या घटनेमुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेत तिची विचारपूस केली. यावेळी तिला शब्द दिला की, आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ‘ताई तुला आज सांगतो. आम्ही तुझा बदला घेणार. ज्या हातांनी तुला मारलं त्याच हातांचा आम्ही बंदोबस्त करणार,’ असे अविनाश जाधव म्हणाले. नागरिकांमध्ये या घटनेनंतर संताप आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी झाली. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, पीडितेने एका वृत्त वाहिनीला या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ती घटना सांगितली, त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. हे दृश्य काळजात धस्स करणारे आहेत. पीडिता म्हणाली, ‘त्या व्यक्तीने मला शिवीगाळ केली. मी फक्त एवढंच बोलली की, सर तुमचा नंबर नाही. नंबर येण्यास अजून वेळ आहे. नंबर आली की मी तुम्हाला आतमध्ये पाठवेन. यात माझी काय चूक आहे? माझी काही चूक नसताना त्याने मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने मला प्रचंड अमानुष मारहाण केली. माझे केस ओढून मला बाहेर दरवाजापर्यंत नेलं. मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या पायाचे निशाणा माझ्या टीशर्टवर आहे.’

