Manikrao Kokate on Online Rummy : या प्रकरणाची चौकशी लावा, मी दोषी आढळलो, तर नागपूर अधिवेशनात एक सेकंदाचाही विलंब न लावता मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी तयारीही माणिकराव कोकाटे यांनी दाखवली.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
शेतकरी समृद्धी योजनेसंदर्भात घोषणा करण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पत्रकारांनी ऑनलाईन रमीवरुन छेडले असता, ते म्हणाले की यासंदर्भात मला प्रश्न विचारला जाणार, याची कल्पना मला होती. मुळात हा विषय छोटा आहे. तो का लांबवला जातोय, हे मला समजत नाही. मी आधीही खुलासा दिला आहे. ऑनलाईन रमी काय प्रकार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ते खेळण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर, बँक अकाऊण्ट ऑनलाईन रमी खात्याशी संलग्न करावं लागतं, असं कोकाटे म्हणाले.
Jagdeep Dhankhar यांचा राजीनामा, उपराष्ट्रपतिपदासाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव आघाडीवर
एक रुपयाचीही रमी खेळलो नाही
पुढे माणिकरावांनी आपला मोबाईल नंबर सांगितला आणि म्हणाले की कुठेही चौकशी करा, मी एक रुपयाचीही रमी खेळलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. माझी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. फक्त गेमची जाहिरात लोड झाली. कारण नवीन मोबाईल होता, स्कीप कसा करायचा मला कळत नव्हतं, असंही कोकाटे म्हणाले.
कृषीमंत्र्यांसह अजित पवारांनीही राजीनामा द्यावा, सूरज चव्हाणांविरोधात छावा कार्यकर्ते आक्रमक
Devendra Fadnavis : ठाकरेंचा नेता फडणवीसांच्या उपस्थितीत ‘कमळ धरणार’, आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? भाजप निष्ठावंतांचा भडका
…तर मंत्रिपदाचा राजीनामा सादर करेन
या प्रकरणात चौकशी लावावी, जर मी दोषी सापडलो तर नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कोणालाही न भेटता एका सेकंदात मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझा मंत्रिपदाचा राजीनामा सादर करेन, असं माणिकराव म्हणाले. मी शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील असं काही केलं नव्हतं, यात वेडं वाकडं काही नाही, छावा संघटनेच्या भावना दुखाव्यात असं मी काही केलं नाही, कोणाचाही विनयभंग केला नाही, असंही कोकाटे म्हणाले.

