Dharashiv News : धाराशिवमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्या मुलाला आपल्या पोटच्या मुलासारखं संपवलं त्यानेच आईला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
धाराशिवमधील तूळजापूरमध्ये संग्राम पाटील आणि त्यांची आई एकत्र राहत होते, त्यांच्या आईच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे 15 ते 16 तोळे सोने असायचे, त्या नेहमी ते सोने वापरत असत. शेजारील राहणारा 21 वर्षीय ओम निकम हा नेहमी घरी यायचा, त्याच्या लग्नाची आणि लग्न ठरल्याची बोलणी करायचा.
Dharashiv News : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणे पुजाऱ्यांना भोवले; मोठी कारवाई होण्याची शक्यता
18 जुलै रोजी चित्रा ताई घरी नव्हत्या त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे तेव्हा त्या ओम निकम सोबत फोन आल्यावर कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री उशिरा ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आई सोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा ताईचा मृतदेह सापडला आणि त्यांच्या अंगावर दागिने नव्हते.
चित्रा ताई यांनी ज्या ओमला स्वतःच्या मुला, लेकरासारखं सांभाळल, त्याच्या सुखदुःखात आईसारखी खंबीरपणे आधार दिला त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला, त्याचा गळा दाबून न खुन केला व अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले. माणुसकीला काळीमा फसणारे हे कृत्य घडले असून यामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेने तुळजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

