Rainwater In Mumbai AC Local : मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. ऐन गर्दीच्यावेळी एसी लोकच्या छतावरुन पाण्याच्या धारा वाहत होत्या. संतापलेल्या प्रवाशांनी याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला.
This is mumbai’s ac local….
All rain water coming in side. For this we pay so much ?????? @RailMinIndia @ajeetbharti @Dev_Fadnavis @JaipurDialogues @Sanjay_Dixit @AshwiniVaishnaw @WesternRly @indianrailway__ pic.twitter.com/zCceLf92EH
— jai ho (@ab61517886) July 21, 2025
रेल्वे प्रशासनाने या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी मुंब्रा येथे लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने मुंबईच्या सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. जेणेकरुन लोकलच्या दारावर कोणालाही लोंबकळता येणार नाही. परंतु लोकलची दार बंद केल्यानंतरही जर प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर प्रवाशांनी काय करावं? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.
Mumbai News: अटल सेतू बनणार हायटेक, ऑप्टिकल फायबरमुळे प्रवाशांना मिळणार इंटरनेट सुविधा दरम्यान, जोरदार पावसामुळे मरीन ड्राइव्ह, अंधेरी, कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पाणी साचले. अंधेरी सबवे काही वेळासाठी बंद ठेवण्यात आला होता. कुर्ला, पवई आणि साकीनाका येथे वाहतूक कोंडी झाली होती.

