Solapur Marathi News : सोलापूरमध्ये तेरा महिन्यांच्या बाळाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. बाळाच्या मामाच्या तक्रारीनंतर, पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. बाळाचे दोनदा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.
सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तेरा महिन्याच्या बाळाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी रात्री बाळाचे शेतात पुरलेलं मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तहसीलदारांच्या उपस्थितीत रविवारी रात्रीच श्री या 13 वर्षीय बाळाचे मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नाही. तहसीलदारांच्या स्वतंत्र अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.
Solapur News : रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाहीत, पत्नीचा मध्यरात्री फोन पण… सकाळी भयंकर समोर, सोलापुरात डॉक्टरचा हृदयद्रावक अंत
मामुरे यांचे दक्षिण सोलापूर येथील कुमठे येथे शेतवस्तीत घर आहे. शेतातील शेततळे हे घराला लागूनच जवळपास दहा फूट अंतरावर आहे. त्याला कोणतेही कंपाउंड नाही. यामुळे खेळत जाऊन श्री त्यात पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. बाळाच्या काकांनी रविवारी सकाळी श्री चा मृतदेह शेततळ्यात तरंगताना पहिला होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी श्री या तेरा महिन्याच्या अंत्यविधी घराच्या पाठीमागे छोटा खड्डा खोदून करण्यात आला होता. श्री या तेरा महिन्याच्या बाळाच्या मामाने तक्रार केल्यानंतर रविवारी रात्रीच श्रीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.
पोलिसांनी हात झटकले; प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारे जामिनासाठी पात्र
शेततळ्याला कुंपण बांधणार होते, पण…
13 महिन्याचं बाळ श्री ज्यावेळी शेत तळ्यात पडला त्याघटनेवेळी श्रीची आजी ही शेळ्यांना चरायला घेऊन शेतात गेली होती.श्रीचे वडील गावी गेले होते, तर आई व घरातील इतर मंडळी कामात व्यस्त होते. कुमठे गावापासून सोरेगावच्या रस्त्याला जवळपास चार किलोमीटरवर मामुरे यांचे शेत व वस्ती असून एका ठिकाणी जेमतेम दोन ते तीन घरे आहेत.तेथे १२ फूट खोल शेततळे तयार केले आहे. याच्या सुरक्षेसाठी त्यांनी कुंपण बांधण्याचे नियोजनही केले होते. यासाठी पैसेही गोळा केले होते, पण श्रीच्या आजोबांचा दोन महिन्यांपूर्वीच अपघात झाला. यातच लाखांचा खर्च झाला. यामुळे कुंपणाचे काम लांबले आणि श्री चा घात झाला.

