• Thu. Jul 23rd, 2026
    उज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, निकम परिवारात आनंद; एकमेकाला पेढे भरवले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर….नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या निमित्ताने जळगाव शहरातील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून…पेढे वाटून आणि ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. निकम कुटुंबातील रोहित निकम, शैलेजा निकम, रितेश निकम यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही यावेळी उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता राज्यसभेवर….नामनिर्देशित खासदार म्हणून झालेली निवड ही अ‍ॅड. निकम यांच्या कार्याचा…योग्य गौरव असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed