• Sat. Mar 7th, 2026
    संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं, नेमकं काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये नागरी सत्कारासाठी….बोलावण्यात आलं असताना, शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळ फासून तीव्र निषेध केला. गायकवाड यांनी स्वामी समर्थ आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत अपशब्द….वापरल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभर संताप आहे. शिवधर्म फाउंडेशनने स्पष्ट इशारा दिला आहे की, संघटनेच्या नावातून ‘छत्रपती संभाजी’….महाराजांचा उल्लेख थांबवला नाही, तर गायकवाडांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही.हे प्रकरण घडल्यानंतर अद्याप प्रवीण गायकवाड यांनी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणावर गायकवाड नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed