Chandrapur Marathi News : चंद्रपुरात आनंदनगर येथे वैशाली रायपुरे या विवाहितेने मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. रामनगर पोलिसांनी पती, सासू आणि दिरावर गुन्हा दाखल केला असून ते फरार आहेत. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी तिला त्रास देणे सुरू केले होते, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे.
प्राप्त माहिती नुसार २२ जूनला आनंदनगर येथे वैशालीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला होता. मानसिक व शारीरिक छळातून तिने आत्महत्या केल्याचे चौकशीत समोर आले. यामुळे पोलिसांनी पती शिवा रायपुरे, सासू तिलोतमा रायपुरे, दीर दीपक रायपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेपासून तिघेही फरार आहेत.
वाघोबाच्या ताडोब्यातील सफारी महागली; आता पर्यटकांना मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क, वाचा नवा नियम
हुंड्यासाठी छळ
वैशालीचे नोव्हेंबर 2022 मध्ये लग्न झाले. काही दिवस आनंदात गेले. मात्र सासरच्या मंडळीने खरा रंग दाखविणे सुरु केला. माहेरून पैसा आणण्याचा तगादा सासरच्यांनी लावला. या त्रासाला कंटाळून वैशाली 2023 मध्ये माहेरी गेली. काही महिन्यानंतर पती शिवा याने सासर गाठले. हुंड्यासाठी त्रास होणार नाही याची हमी दिली. त्यानंतर वैशाली सासरला गेली. मात्र त्रास थांबला नाही. याला कंटाळून तिने पंख्याला गळफास लावून जीवन संपवले.
Chandrapur Crime : अरे प्रदीप थांब वहिनीला मारू नकोस…! मध्यस्थी करणाऱ्या भावासह वडिलांवरच फिरला, पण शेवट अत्यंत भयंकर
पोलिसांचे आवाहन
शिवा रायपुरे, तिलोतमा रायपुरे आणि दीपक रायपुरे हे तिघेही मागील काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. हे तिघे कुणालाही आढळून आल्यास रामनगरचे पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे (८५५२०७९८०७), पोलिस नियंत्रण कक्ष (०७१७१-२६३१००), पोलिस स्टेशन रामनगर (०७१७२-२५३२००) यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

