• Fri. Mar 20th, 2026

    कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 4, 2025
    कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव  – महासंवाद




    बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे कराव,  असे आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यावर कडक करवाई करावी, अशा सूचना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्यात

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली त्यावेळी  त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, आरोग्य उपसंचालक डॉ भंडारी, आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ, डॉ जीवन बच्छाव, उपसचिव विशाल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते.

    यावेळी  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागेचा आढावा घेत रिक्त जागा त्वरित भरण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेतील सर्व  घटकांनी  सामूहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे . त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. क्षय मुक्त भारत बनविण्यासाठी निक्षयमित्र योजनेत सर्व अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संघटना, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करुन घ्या, अशा सूचना यावेळी केद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी दिल्या.

    ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यन्वीत  करण्यासाठी भौतीक सुविधा पोहचविणे आणि बांधकाम हे  चांगल्या दर्जाचे करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . पीएमजेवाय  योजने अंतर्गत आयुष्मान कार्डची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत, तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करून एक महिन्याच्या आत सर्व लोकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यातील जन्मदर आणि मृत्युदराचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय आणि जन औषधी केंद्र सुरू करा. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना उपचार सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  जाधव यांनी यावेळी दिले.      

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed