Sangli Father And Son Ends Life: सांगलीत एका मुलाने आपल्या वडिलांसह आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शुक्रवार (4 जुलै) सकाळच्या सुमारास हे दोघेही पिता- पुत्र शेतामध्ये गेले होते. तिथेच या दोघांनी कीटकनाशक प्राशन करत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. गावातील इतर नागरिकांना शेतामध्येच या दोघांचे मृतदेह पडलेले आढळून आले. यावेळी दोघांच्या मृतदेहा शेजारी कीटकनाशक औषधांच्या बाटल्या देखील आढळून आल्या होत्या. या घटनेने गावात एकच खळबळ माजली.
Sangli News: घरातून निघाल्या, मग वाटेत गाडीमागे बॉडी सापडली; मुंबईच्या महिला डॉक्टरने सांगलीत आयुष्य संपवलं
या घटनेची माहिती मिळताच, मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मिरजच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करुन घेतली असून पुढील तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे.
गणेश कांबळे आणि इंद्रजित कांबळे या दोघा पिता- पुत्रांनी कोणत्या कारणातून आपले आयुष्य संपवले? याबाबत सध्या कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे सोनी गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या दोघांनी असं का केलं हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
Alibag News: मुंबईहून पार्टीसाठी अलिबागला आले, रात्री नशेत सहकऱ्याकडून महिलेवर जबरदस्ती, अन् मग सकाळी…
या घटनेची माहिती मिळताच मिरजचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. इंद्रजित कांबळेचे मागच्या महिन्यात लग्न झाले होते. नवविवाहित तरुणाने आणि त्याच्या बापाने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

