Pune Airport : पुणे विमानतळावर ‘एअर इंडिया’ फ्लाईटच्या हवेतच घिरट्या, 57 मिनिटांचा विलंब
पुणे विमानतळावर भुवनेश्वर ते पुणे हे विमान उतरत असताना कुत्र्याचा अडथळा आल्याने विमानाला शनिवारी हवेतच घिरट्या माराव्या लागल्या. त्यामुळे विमानाला 57 मिनिटे उशीर झाला. अहमदाबाद येथील ‘एअर इंडिया’च्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे विमानतळावर हा गंभीर प्रकार समोर आला आहे.
