महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो शेअर केल्यानंतर एकत्र मोर्चाची घोषणा केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चाबाबत ते म्हणाले, महाराष्ट्रातील मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं सध्या गरजेचं आहे. असं आव्हान राज ठाकरेंनी केलं होतं. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आता मिळतो आहे. ज्यावेळी हा मोर्चा निघेल त्यावेळी तो महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ऐतिहासिक मोर्चा ठरेल.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा राजकीय विचार करण्यापेक्षा ज्या पद्धतीने मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठी माणसावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे, त्याविरोधात एकत्र येत आवाज उठवणं आणि मराठी माणसाची ताकद दाखणवं जास्त गरजेचं असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.
