• Thu. Jun 18th, 2026

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 25, 2025
    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद




    मुंबई दि. 25 : नागपूर जिल्ह्यात कामठी येथे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील जागेची उपयोगिता बदलून पर्यटकांची निवास व्यवस्था करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त आणि ओगावा संस्था ही कार्यान्वयन यंत्रणा असेल. संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

    ओगावा संस्थेच्या नवीन बांधकाम प्रस्तावाबाबत मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओगावा संस्था ड्रॅगन पॅलेस परिसर विकसित करीत आहे. तेथील बांधकामाबाबत ओगावा संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून काम करावे. तसेच याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या उपयोगिता बदलण्याच्या प्रस्तावाबाबत नागपूर जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करुन तो शासनाकडे पाठवावा, असे आदेशही त्यांनी दिले.

    ०००००

    बी.सी.झंवर/विसंअ/

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed