मध्य रेल्वेवर २०१२-१३ मध्ये १५ डब्यांच्या लोकल धावू लागल्या. त्यावेळी लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या असल्या, तरी मागील १३ ते १४ वर्षांत एकही लोकल नव्याने वाढविण्यात आलेली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेकडून मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकलपैकी नऊ गाड्या १५ डब्यांच्या आहेत. या मार्गावर दिवसभरात ८० वातानुकूलित फेऱ्या धावतात. रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यास, यावर उपाय करणे शक्य आहे. मात्र तिसरी व चौथी मार्गिका भूसंपादनामुळे रखडली आहे. प्रवाशांकडूनच रेल्वेला जागा देण्यास विरोध होत असेल, तर रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण कसे करणार, असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरवाजात लटकून धोकादायक प्रवास, लोकल फेऱ्या वाढवण्याच्या मागणीकडे १३ वर्षांपासून दुर्लक्षच; गर्दी विभागण्यासाठी अधिकाऱ्यांचा सल्ला
‘सध्या लोकल फेऱ्या वाढविण्याचे कोणतेही नियोजन नाही. वाढत्या गर्दीवर पर्याय म्हणून कार्यालयीन वेळा काही प्रमाणात बदलल्या जाव्यात, त्यामुळे गर्दी विभागली जाईल,’ असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केले आहे.
