• Wed. Sep 23rd, 2026
Breaking News 16th May 2025 : वाचा शुक्रवार १६ मे २०२५ च्या ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील अनेक भागात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह मराठवाडा, विदर्भ तसंच कोकणातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे. महापालिका निवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याचं सांगितलं आहे. तसंच पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी ड्रोन उडवण्यावर बंदी असून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. भर मे महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळीपाऊस झाला असून यामुळे उन्हाळी पिकांसह आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा संभ्रम आहे. अशात या निवडणुका वेळेत व्हाव्यात, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. तसंच देशात पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असलं, तरी पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतीय सैन्याने गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम आणि मणिपूरमध्ये एकूण १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

LIVE UPDATES

  • 07:53 AM, May 16 2025

    Earthquake in China : चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, आज भारतीय वेळेनुसार ६ वाजून २९ मिनिटांनी भूकंप – राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती

  • 07:46 AM, May 16 2025

    विकी कौशलला खावी लागलेली तुरुंगाची हवा, भलत्याच जागी होतं शूट, शेवटच्या मिनिटाला असं काही घडलं की….

  • 07:46 AM, May 16 2025

    Tharala Tar Mag : देश सोडून फरार व्हायचा प्रियाचा निर्णय, लेकीसाठी महिपत दामिनी देशमुखच्याही जीवावर उठणार

  • 07:41 AM, May 16 2025

    Defence Minister Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज शुक्रवारी, १६ मे रोजी भूज येथील हवाई दल तळाला भेट देणार

  • 07:31 AM, May 16 2025

    Ajit Pawar Speech : उद्या २१ च्या २१ आमदार निवडून आणायचे, भाषणावेळी अजितदादा चुकले, माफीही मागितली!

  • 07:29 AM, May 16 2025

    Ajit Pawar : मला तर अमित शाह नावाने ओळखतात, तुम्हाला ओळखतात का? अजित पवारांचा विरोधकांना टोला

    केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी माझी ओळख आहे. मात्र मला तर अमित शहा नावाने ओळखतात. तुम्हाला ओळखतात का? अजित पवारांचा टोला (वाचा सविस्तर)
  • 07:28 AM, May 16 2025

    Vicky Kaushal : विकी कौशलला खावी लागलेली तुरुंगाची हवा, भलत्याच जागी होतं शूट, शेवटच्या मिनिटाला असं काही घडलं की….

  • 07:27 AM, May 16 2025

    Narayan Rane : नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

    १९९८ मध्ये पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सुमारे २९ एकर राखीव वनजमीन नामांकित बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बेकायदा ठरवत नारायण राणे यांना मोठा दणका दिला आहे. (वाचा सविस्तर)
  • 07:24 AM, May 16 2025

    Nanded News : बाहेर जातो सांगून गेला तो आलाच नाही, तीन दिवसांनी गोदावरीत बॉडी; नर्सिंगच्या विद्यार्थ्याचं नांदेडमध्ये टोकाचं पाऊल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed