• Wed. Mar 18th, 2026

    मला उद्या 11 नंतर उठवा, लॉजवाल्यांना सांगितलं; गर्लफ्रेण्डला VC करत ‘ऑपरेशन मौत’चा उल्लेख अन्

    मला उद्या 11 नंतर उठवा, लॉजवाल्यांना सांगितलं; गर्लफ्रेण्डला VC करत ‘ऑपरेशन मौत’चा उल्लेख अन्

    Jalgaon Man ends life on Lodge : अहमदाबाद येथील सौरभ शर्मा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम. पी. या नावाने भाड्याने राहत होता.

    (फोटो– Lipi)

    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे बस स्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गुजरात येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ शर्मा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

    सौरभ शर्मा हा तरुण अहमदाबाद येथील रहिवासी होता. त्याच्याविरुद्ध अहमदाबादमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    काय आहे प्रकरण?

    गुरातमधील अहमदाबाद येथे दाखल पोस्कोच्या गुन्ह्यातील एका संशयिताने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर बस स्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

    अहमदाबाद येथील सौरभ शर्मा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करणसिंग एम. पी. या नावाने भाड्याने राहत होता. रोज तो अकराला उठवायला सांगायचा. मात्र, सोमवारी त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते, की मला उशिरा उठवा.
    Pune Crime : उज्ज्वला वारुळेंनी जीव दिला नाही! पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती, वाघोलीत घटनेत ओढणीमुळे नवा ट्विस्ट
    दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी हॉटेलचे कर्मचारी त्याला उठवायला गेले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही, म्हणून पोलिसांना माहिती देण्यात आली.

    Jalgaon Crime : मला उद्या 11 नंतर उठवा, लॉजवाल्यांना सांगितलं; गर्लफ्रेण्डला VC करत ‘ऑपरेशन मौत’चा उल्लेख अन्…

    दरम्यान, आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून सौरभने लॉजमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात हलवला. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    Pune Crime : मसाज पार्लरच्या नावाखाली अश्लील प्रकार, पुण्यात बापलेकाला बेड्या, स्पाय कॅमने व्हिडिओ बनवत…
    सौरभने मृत्यूपूर्वी प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला. मी ‘ऑपरेशन मौत’च्या जवळ पोहोचल्याचे सौरभने सांगितल्याची माहिती आहे. सौरभने त्याच्या डायरीत त्याची फसवणूक करणारी मुलगी आणि तिच्या नातेवाइकांचा उल्लेख केल्याचेही बोलले जाते.

    रायगडमध्ये मैत्रिणीची हत्या करुन आत्महत्या

    दुसरीकडे, प्रेमप्रकरणाच्या वादातून मैत्रिणीवर कोयत्याने वार करून तिची हत्या केल्यानंतर, तरुणाने गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपविल्याची घटना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात परळी येथे घडली.

    पाली खोपोली मार्गावरील परळी येथे मंगळवारी सायं. ५ वाजण्याच्या सुमारास शेखर संतोष दुधाणे (२६, रा. दुधाणेवाडी) याने येथील नर्सिंग होममध्ये जाऊन तिथे काम करणाऱ्या पौर्णिमा अनंता देसाई (२२, रा. देसाईपाडा) हिच्या मनगटावर व गळ्यावर कोयत्याचे वार करून तिची हत्या केली. नंतर त्याने तेथील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातील वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed