Nandurbar Crime News : नंदुरबार पोलिसांनी गोव्यात मोठी कारवाई केली. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. नागेश उर्फ नाकक्षा पाडवी असे आरोपीचे नाव आहे. तो चोरी, हाणामारी अशा गुन्ह्यांमध्ये सामील होता. त्याच्यावर नंदुरबार जिल्ह्यात आठ गुन्हे दाखल आहेत. इतर राज्यांमध्येही त्याचे गुन्हे आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या टीमने ही कामगिरी केली.
नंदुरबार जिल्ह्यात चोरी, हाणामारी तसेच मालमत्तेविरुद्ध 8 गुन्हे तसेच इतर राज्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. असा सराईत गुन्हेगार अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांना खबर मिळाली की तो गोवा येथे सराईत फरार आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोवा येथे रवाना झाले. अनेक बीज पालथे घातल्यानंतर अखेर कलंगुड बीचवरून त्याला अटक केली.
Jalgaon Accident : सीईटीची परीक्षा देऊन चालले असताना काळाचा घाला, मुली देखत वडिलांचा अपघातात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या पाडवी, रा. कात्री, ता. धडगाव हा आरोपी गोवा येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, पाटील यांनी तात्काळ एक पथक गोव्याला रवाना केले. गोवा पोलिसांच्या मदतीने या पथकाने गोव्यात गोव्यातील अनेक बीज पालठे घातली. अखेर कळंगुट बीचवरून नागेश उर्फ नाकक्षा पाडवी याला ताब्यात घेतले.
Jalgaon News : फौजी होणं सोपं नाही गड्या! मुलीच्या वाढदिवसासाठी स्पेशल रजा, घरी येताच फोन वाजला अन् केक कापून जवान ४ तासात माघारी
चौकशीदरम्यान त्याचे खरे नाव राज्या ऊर्फ नाकक्षा ऊर्फ नागेश दमण्या पाडवी (वय २७ वर्षे) रा.कात्री ता.धडगाव असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यात चोरी हाणामारी आणि मालमत्तेसंबंधी एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, राज्याबाहेरही त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत, असे तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि. मुकेश पवार, पोहेकॉ सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंखे, पोना मोहन ढमढेरे आणि पो.शि. यशोदिप ओगले यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

