• Tue. Mar 10th, 2026

    दुचाकीवरुन फिरताना ट्रकला धडक, फिलिपिन्सला गेलेल्या वसई येथील पती-पत्नीचा एकत्र अंत

    दुचाकीवरुन फिरताना ट्रकला धडक, फिलिपिन्सला गेलेल्या वसई येथील पती-पत्नीचा एकत्र अंत

    Vasai Couple Died In Philippines: फिलिपिन्सला फिरायला गेलेल्या पती-पत्नीचा अपघात मृत्यू झाला आहे. दुचाकीच्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    (फोटो– Lipi)

    नमित पाटील, वसई: फिलिपिन्स येथे पर्यटनासाठी गेलेल्या वसई येथील दाम्पत्याचा ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेराल्ड परेरा (वय 50) आणि प्रिया परेरा (वय 46) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ते वसईचे राहणारे असून फिलिपिन्सला फिरायला गेले होते. तिथेच हा अपघात झाल्याची माहिती आहे.

    वसईतील सांडोर परिसरात राहणारे पती जेराल्ड परेरा आणि पत्नी प्रिया परेरा हे दाम्पत्य पर्यटनासाठी फिलिपिन्स देशात गेले होते. त्या ठिकाणी फिरण्यासाठी त्यांनी भाडेतत्त्वावर दुचाकी घेतली होती. भाडेतत्त्वावर फिरण्यासाठी घेतलेल्या दुचाकीवरून दाम्पत्य जात असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या या धडकेत दुचाकी एका सिमेंटच्या खांबाला धडकून भीषण अपघात घडला. याच अपघातात या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे.

    पत्नीचा जागीच मृत्यू, तर पतीचा उपाचारदरम्यान मृत्यू

    शनिवारी (10 मे) सकाळच्या सुमारास फिलिपिन्स येथील बडियान परिसरात हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने पत्नी प्रिया परेरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने जेराल्ड परेरा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
    Chh. Sambhajinagar News: चुलत बहिणीच्या लग्नासाठी पुण्याहून गावी, शेतात गेला अन्… मुलाची अवस्था पाहून बापाचा टाहो
    अपघातात जखमी झाल्यानंतर जेराल्ड परेरा यांनी स्वत: वसई – माणिकपूर येथील चर्चमधील धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती दिली. त्यामुळे या अपघाताची माहिती परेरा कुटुंबीयांना व सांडोर परिसरातील नागरिकांना मिळाली. या अपघाताची माहिती दिल्यानंतर अपघातात जखमी झालेले जेराल्ड परेरा यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत दाम्पत्याचे कुटुंबीय फिलिपिन्स येथे गेले असून त्यांचे मृतदेह वसईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

    Vasai News: हॅलो! आमचा अपघात झालाय; फोनवरुन माहिती अन् काहीच वेळात… वसईच्या दाम्पत्याचा फिलिपिन्समध्ये अंत

    पर्यटनासाठी फिलिपिन्स जेराल्ड आणि प्रिया परेरा या दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed