Mumbai News : पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिक बिघडले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. जम्मू-काश्मीर, अमृतसर, राजस्थानच्या सीमावर्ती भागांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ११ मे ते ९ जूनपर्यंत फटाके वाजवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत तिन्ही लष्कर प्रमुख आणि सीडीएस यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. सीमा भागातील प्रत्येक घडामोडींवर देशाचे लक्ष आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील काही काही शहरे हाय अलर्ट मोडवर आहेत. तेथील सुरक्षा वाढवली असून प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे आणि प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. यादरम्यान मुंबईमध्ये कडक असा पोलिस बंदोबस्त बघायला मिळतोय.
Mumbai Police: दादर चौपाटी बंद राहणार? समुद्रकिनारी जाण्यास मनाई? मेसेज व्हायरल होताच मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरणयापूर्वी दहशतवाद्यांनी मुंबईला टार्गेट केले आहे, मुंबईमध्ये जागोजागी पोलिस बंदोबस्त बघायला मिळत आहे. यासोबतच आता मोठा आदेश काढण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी ११ मे ते ९ जूनपर्यंत फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे, पहलगाम हल्ल्यानंतर देशात जी परिस्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास एक महिना ही फटाके बंदी मुंबईमध्ये लागू करण्यात आलीये. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई ही केली जाईल.
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. ज्यामुळे २६ पर्यटकांचा जीव गेला. फक्त हेच नाही तर दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळीबार केला. यादरम्यान त्यांनी पुरूषांना टार्गेट केले. या पहलगाम हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पहलगामवर हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली हेच नाही तर ऑपरेशन सिंदूर देखील सुरू केले. पहलगामवरील हल्ल्यानंतर देशात लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले.

