Maharashtra Weather : पुढील पाच दिवसात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूरमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता आहे.
राज्यावर अवकाळीचे ढग कायमच पावसाचा इशारा
विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असतानाच आता भारतीय हवामान खात्याने मोठा इशारा दिला आहे. राज्यात अवकाळीला पोषक वातावरण बघायला मिळतंय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस मराठवाड्यात पडताना दिसतोय.
Maharashtra Weather Update : अवकाळी पिच्छा सोडेना, पुढचे 24 तास महत्त्वाचे, गारपिटीची शक्यता, बळीराजावर मोठं संकट
नागपूर, चंद्रपूर, गोदिंया, भंडारा, गडचिरोलीमध्ये पुढील चार दिवस पाऊस
मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूरचा समावेश आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोदिंया, भंडारा, गडचिरोली आणि वर्धामध्ये पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. थोडक्यात काय तर राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो.
सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
राज्यात अजूनही अवकाळी पावसाचा पोषक वातावरण असल्याचे बघायला मिळतंय. मार्च महिन्यात होळीनंतर पारा वाढण्याचे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न होता. अनेक भागात अवकाळी पावसाने सुरूवात केली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच गारपिट झाली आणि फळ बागांचे नुकसान झाले. पुढील काही दिवस राज्यात अवकाळीचे ढग कायम असण्याचे संकेत आहेत. जून महिन्याला सुरूवात होण्यास वेळ आहे. मात्र, त्यापूर्वीच पाऊस सुरू आहे.

