वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत
मुंबई, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित…
राज्यातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 10 : महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण व जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांनी वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन
लातूर, दि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिका, घडीपत्रिका आणि मनरेगा…
एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक संकलनास प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा लातूर, दि. 10, (जिमाका) : राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे…
‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धान खरेदीबाबत पुढील आठवडयात भंडाऱ्यात बैठक भंडारा, दि. 10 : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी मान्सुनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र यावर्षी अल…
जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दिनांक 10 मे 2023 (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या निमित्ताने या दोन राज्यांतील बाजारपेठांचा सांधा म्हणून नंदुरबार…
रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य…
सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १०- सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी…
अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १० : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात…
कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची थकवलेली रक्कम बेस्ट व्यवस्थापनाने महिन्याभरात जमा करावी – कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे
मुंबई, दि. 10 : नियुक्त कंत्राटदाराने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य…