मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कोकणातील माजी खासदार विनायक राऊत अडचणीत आले आहेत. कारण राऊत यांच्या सुनेनं त्यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांवर छळ केल्याचा आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. “माझा पती गितेश राऊत हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असमर्थ असल्याचं माहीत असूनही सासरे विनायक राऊत आणि सासू शामल राऊत यांनी माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं. तसंच लग्नानंतर माझा वारंवार मानसिक छळ केला. तसचं एका बुवाच्या मदतीने अघोरी कृत्यं केलं,” असा आरोपी पीडित सुनेनं आपल्या तक्रारीत केला आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत कुटुंबाची बाजू मांडत सुनेने केलेले आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे.
सुनेचे आरोप खोडून काढत विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की, “आमच्या सुनेनं म्हटलंय की २०१८ ते २०२२ या काळात तिचा छळ करण्यात आला. तसंच अघोरी कृत्यं करण्यात आलं. तिने स्वत:च असा दावा केलाय की त्या बुवाकडे जाताना माझे आई-वडीलही सोबत होते. मग आई-वडील सोबत असताना अघोरी कृत्य कसे होऊन दिले? तसंच ही घटना २०१८ ते २०२२ या काळात घडल्याचं सांगितलंय मग तक्रार आता २०२६ मध्ये का केली? जेव्हा छळ झाला तेव्हाच तक्रार का केली नाही?” असा सवाल करत राऊत यांनी सुनेच्या आरोपांचं खंडन केलं आहे.
“पैशांची मागणी, नकार दिल्याने तक्रार दिली”
विनायक राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याऱ्या सुनेवरच गंभीर आरोप केले आहेत. “माझा मुलगा आणि सून मागील तीन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. तसंच आता त्यांची घटस्फोटाची केसही सुरू आहे. सुनेने आधी आमच्याकडे १० कोटी रुपये मदत, २ कोटी रुपये मानसिक ताण दिला यासाठीची रक्कम, ३ बीएचके फ्लॅट, एक आलिशान कार द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र एवढ्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यानेच तिने आमच्याविरोधात तक्रार दिली. मात्र हे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित असून २३ तारखेला सुनावणी आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास आहे,” असंही राऊत म्हणाले.
सुनेचे पतीसह सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप
“लग्न झाल्यानंतर मी पती गितेश राऊत याच्यासोबत विविध देशांमध्ये फिरायला गेली. मात्र तो शारीरिक संबंध ठेवण्यास टाळत होता. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्त्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो, असं बोलून तो मला टाळू लागला. तसंच नंतर त्याने आणि कुटुंबाने माझा मानसिक छळ केला,” असा आरोप पीडित सुनेनं केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा