Pune Ring Road Update : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वर्तुळाकार मार्गात कासार आंबोली येथे बदल करण्यात आला आहे. बांधकाम प्रकल्पातील इमारतींमुळे अडथळा येत असल्याने, ‘एमएसआरडीसी’ने नवीन मार्ग निवडला. यामुळे सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही. ग्राहकांची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.
८०० कोटी रुपयांची बचत होणार
रिंग रोडसाठी कासार आंबोली येथील मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे त्या बांधकाम प्रकल्पातील रहिवाशांना कोणताही धक्का बसणार नाही; तसेच त्या रहिवाशांच्या घरांचे नुकसान होणार नाही. ग्राहकांची अवास्तव मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने मार्गाच्या आखणीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्यावसायिकाने प्रकल्प उभारला आहे. त्या प्रकल्पात सुमारे तीनशेहून अधिक सदनिका आहेत. त्या इमारतींचा काही भाग रिंग रोडच्या मार्गात येत असल्याचे असल्याचे दिसून आले होते. त्याबाबत तेथील रहिवासी; तसेच सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी याबाबत रस्ते विकास महामंडळाकडे भरपाई देण्याची मागणी केली होती. त्याबाबत न्यायालयात खटला प्रलंबित आहे. या संदर्भात या सर्व रहिवाशांसह सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी रस्ते विकास महामंडळाकडून सदनिकेच्या किमतीच्या चौपट रकमेची मागणी केली होती.
ग्राहकांच्या मागणीनुसार, चौपट रक्कम वाढवून देण्यासाठी रस्ते विकास महामंडळाला सुमारे आठशे कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ग्राहकांची ही मागणी महामंडळाला परवडणारी नाही. त्यामुळे महामंडळाने न्यायालयात, ‘ग्राहकांची मागणी ही परवडणारी नाही. मुळात त्या बांधकाम प्रकल्पाची थोडीच बाजू रिंग रोडमध्ये जात आहे. त्यामुळे एवढी मोठी रक्कम देणे शक्य नाही, असे स्पष्ट करून कासार आंचोलीमधून या इमारतीमधून जाणाऱ्या रिंगरोडची आखणी बदलण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, त्या बांधकाम प्रकल्पाच्या शेजारून रिंग रोडच्या नव्या मार्गाची आखणी करण्यात आली आहे. त्याबाबत महामंडळाने न्यायालयात भूमिका मांडली आहे.

