Navi Mumbai Builder Ends Life : गुरु चिचकर हे नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली
गुरु चिचकर हे नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. राहत्या घरातच त्यांनी आयुष्याची अखेर केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे.
Guru Chichkar : नवी मुंबईतील बिल्डर गुरु चिचकर यांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात टोकाचं पाऊल, चिठ्ठीत भयंकर उलगडा
Bharath Bhushan : दहशतवाद्यांचं थैमान, आयुष्यभरासाठी काळजावर कोरलेले नवऱ्याचे शेवटचे 5 शब्द, भारत भूषण काय म्हणालेले?
चिचकरांच्या मुलावर नार्कोटिक्स विभागाकडून अनेक केसेस दाखल आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं चिचकरांनी लिहिलं आहे. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चिचकरांनी तसा उल्लेख केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. नवीन चिचकर सध्या देश सोडून पळून गेले आहेत. एनसीबीला त्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये शोध घेत आहे.
कोटात आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या
‘नीट’ची तयारी करणारा दिल्लीतील विद्यार्थी गुरुवारी सकाळी राजस्थानच्या कोटा येथे रूळांजवळ मृतावस्थेत आढळला. त्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. कोटा येथे विद्यार्थी आत्महत्येची ही गेल्या दोन दिवसांतील दुसरी आणि जानेवारीपासूनची बारावी घटना आहे.रोशन शर्मा (23) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दिल्लीतील तुघलकाबादचा रहिवासी असलेला रोशन कोटा येथे ‘नीट’ची तयारी करीत होता.

