Pahalgam Terror Attack : पुढचे स्थळ चंदनवेलीला जाऊन त्यांना परत श्रीनगरला मुक्कामी जायचे होते. पण चंदनवेलीला पोहोचत नाही तोच दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना मिळाली आणि लगेच माघारी फिरण्याची सूचना करण्यात आली
या पर्यटकांमध्ये गडचिरोलीतील काही सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या कुटुंबियांसह एकूण 43 जण आहेत. हे सर्व जण सोबतच उत्तर भारतात पर्यटनाला गेले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना भीतीने ग्रासले असले, तरी सर्व जण सुखरुप आहेत.
11 एप्रिल रोजी गडचिरोलीतील ज्येष्ठ नागरिकांसह काही पर्यटकांचा जत्था एका ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून रेल्वेने उत्तर भारताच्या पर्यटनाला निघाला. मथुरा, आग्रा, कटरा, वैष्णोदेवी असे करत हे पर्यटक श्रीनगरला पोहोचले. तेथून सोनमर्ग, गुलमर्गमधील निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर घटनेच्या दिवशी, म्हणजे मंगळवारी 22 एप्रिलला ते पहलगामला पोहोचले. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन घाटीत ते घोड्यावर बसून पोहोचले. तेथे डोळ्याचे पारणे फेडणारे नैसर्गिक सौंदर्य पाहून आणि विरंगुळा झाल्यानंतर हा जत्था पुन्हा घोड्यावरुन खाली पहलगामला आला.
Pahalgam Attack : खारट फ्राईड राईसने आयुष्य बदललं, पहलगामला निघालेल्या 11 जणांच्या कुटुंबाचा जीव वाचवला
पुढचे स्थळ चंदनवेलीला जाऊन त्यांना परत श्रीनगरला मुक्कामी जायचे होते. पण चंदनवेलीला पोहोचत नाही तोच दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना मिळाली आणि लगेच माघारी फिरण्याची सूचना करण्यात आली. ज्या ठिकाणावरुन आपणकाही वेळापूर्वी परतलो, त्याच ठिकाणी अशी काही घटना घडली यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ‘हा हल्ला झाला त्यावेळी आपण तिथे असतो तर’ या मनात डोकावलेल्या कल्पनेनेही डोकं सुन्न झालेल्या अवस्थेत ते सर्व जण श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले.
Kaustubh Ganbote : दहशतवाद्याने विचारलं अजान पढते हो? आम्ही बायकांनी टिकल्या काढल्या, अल्लाह हू अकबर ओरडलो; गणबोटेंच्या पत्नीने सांगितला काटा आणणारा अनुभव
Jammu Kashmir Attack : पहलगामहून 43 पर्यटकांचा ग्रुप निघाला, तासाभरात अनर्थ; काश्मिरी मुस्लीम चालक म्हणाला, घाबरु नका, आमच्या घरी राहा
काश्मिरी लोक म्हणाले, ‘घाबरू नका, आमच्या घरी राहा’
घाबरलेल्या गडचिरोलीकर पर्यटकांना त्यांच्या गाडीचा चालक असलेल्या काश्मिरी मुस्लिम नागरिकाने धीर दिला. आमची रोजीरोटी तुमच्या भरवशावर आहे. तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला मदत करतो. गरज पडल्यास आमच्या घरी सुरक्षित राहा, अशा शब्दात काश्मिरी मुस्लिम नागरिकांनी पर्यटकांना हिंमत दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र काश्मिरमधील टूर आटोपती घेत गडचिरोलीकर पर्यटकांचा जत्था बुधवारी सकाळी जम्मूच्या दिशेने रवाना झाला. तेथून अमृतसर, दिल्लीमार्गे हे पर्यटक नियोजित दौरा पूर्ण करून गडचिरोलीला परत येणार आहेत.

