• Fri. Apr 25th, 2025 8:09:17 PM
    हवामान खात्याकडून मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानातील बदलांमुळे अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. हवामान खात्याने दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. जळगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मुंबईत आकाश निरभ्र असले तरी, कोकणात उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. होळीनंतर वातावरण बदलले आहे. मार्च महिन्यातच वारा चढताना दिसला. एप्रिलमध्ये उन्ह अधिक तीव्र होण्याचे संकेत होते. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह झाला. फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान या अवकाळीने झाले. नाशिकमध्ये काही ठिकाणी गारपिट देखील झाली.

    हवामान खात्याकडून देण्यात आला अवकाळी पावसाचा इशारा

    सतत अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. आताही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण हे बघायला मिळतंय. चक्राकार वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. जळगावात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले.
    Sanjay Raut : ‘शिवाजी, शिवाजी…एकेरी उल्लेख करत शाहांकडून महाराजांचा अपमान, गुन्हा दाखल करा’; संजय राऊत आक्रमकदक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात इशारा

    आता भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा हा देण्यात आलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. यादरम्यान ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावताना दिसतोय.

    राज्यावर अवकाळीचे संकट कायम

    मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश सेल्सिअस आणि २४ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. एकीकडे अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला जातोय तर दुसकीकडे मात्र, कोकणात उष्णता वाढताना दिसतंय. कोकणात हवामान खात्याकडून उष्णता वाढणार असल्याचे सांगण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढताना दिसतोय. राज्यातील अनेक भागांमध्ये आतापर्यंत अवकाळीचा तडका बसला आहे. चंद्रपूरमध्येही अवकाळीने हजेरी लावली होती. लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed