• Sat. Sep 19th, 2026

अजितदादांच्या लेकाचा साखरपुडा, सु्प्रिया सुळे सहकुटुंब येणार, दोन कुटुंब जोडणारी ‘ऋतुजा’ कोण?

अजितदादांच्या लेकाचा साखरपुडा, सु्प्रिया सुळे सहकुटुंब येणार, दोन कुटुंब जोडणारी ‘ऋतुजा’ कोण?

Jay Pawar Rutuja Patil Engagement : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा पार पडत आहे. ऋतुजा पाटील यांच्यासोबत जय पवार यांचे लग्न ठरलं आहे. आज होणाऱ्या साखरपुड्याच्या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब पुण्यामध्ये हजर राहणार आहे. खासदार सुप्रिया सुळे या स्वतः संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः आज बारामती मध्ये बोलताना दिली आहे.

Lipi
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा आज साखरपुडा

अभिजित दराडे, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा पार पडत आहे. पुण्यात आज सायंकाळी काही ठराविक मित्र, कुटुंबातील सदस्य आणि पक्षातील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

या सोहळ्यासाठी पवार कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच पक्षातील काही प्रमुख नेते सुद्धा जय पवार यांच्या साखरपुड्याला हजेरी लावणार आहेत. पवार कुटुंबात आलेल्या वादळानंतर आता घरात होत असलेल्या मंगल कार्यालयामुळे संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.
Tuljabhavani Temple : पाचपाखाडीत ‘प्रति तुळजापूर’ मंदिर, जितेंद्र आव्हाडांची संकल्पना, पवार दाम्पत्याच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
साखरपुडा ठरल्यानंतर जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. 13 मार्च रोजी ही भेट झाली होती. या भेटी वेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार ह्या सुद्धा उपस्थित होत्या. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेऊन साखरपुड्याचे निमंत्रण दिलं होतं.
BJP Pune Meeting : मेधा कुलकर्णी उठून गेल्या, चंद्रकांतदादा-मोहळांकडून महिला आघाडीच्या आंदोलनाचं समर्थन; भाजप बैठकीत नेमकं काय घडलं?
या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर शेअर केले होते. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाच्या सूनबाई आहेत.

सुप्रिया सुळे सहकुटुंब उपस्थित राहणार

जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे या संपूर्ण कुटुंबासह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता. मला आमंत्रण दिलं आहे. अर्थातच आमंत्रण दिल्यावर जाणारच. सदानंद सुळे, सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे जाणार आहेत. बाकीच्याचं मला माहीत नाही’, असं म्हणत त्यांनी शरद पवार जाणार की नाही याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभवआणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed