Raigad Grand Mother Ends Life With Grand Child: रोह्यात आजीने आपल्या दोन वर्षांच्या नातवासह तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
उर्मिला सिद्धीराम कोरे या ओम चेंबरमध्ये राहत होत्या. त्यांच्या मुलीचा मुलगा ओमकार विवेक बोगड (एक वर्ष) याला ब्रेनट्युमर आहे. त्याला मुंबईत उपचाराला नेण्यासाठी आजच (9 एप्रिल) त्यांचे पालक रोह्यात आले होते. कोरे यांचे पती धाटाव एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगार आहेत. तर उर्मिला कोरे यांना मानसिक आजार जडला होता आणि त्यावर त्यांनी उपाय केले होते, अशी माहिती मिळत आहे.
Prasanna Sankar: कितीही वेदनेत असले तरी मला करावंच लागायचं; वेश्या, ओपन मॅरेज अन्… प्रसन्ना शंकरच्या पत्नीने काय-काय सांगितलं?
उर्मिला कोरे या मानसिक तणावाखाली होत्या, वेळेत गोळ्या औषधे घेत नसल्याने आजार अधिक बळावला याच मानसिकतेतून आजीने हे टोकाचे पाऊल उचलले नाही ना? असे बोलले जात आहे. तरीही घटनेबद्दल संभ्रम कायम आहे. बुधवारी सकाळी साडेसहा-पावणेसातच्या दरम्यान, उर्मिला कोरे एक वर्षांचा नातू ओमकारला घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या आणि खाली उडी मारली. यात उर्मिला कोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नातवाची स्थिती गंभीर होती. ओमकारला तातडीने पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्याचे प्राणज्योत मावळली.
या घटनेनंतर रोह्यात खळबळ उडाली आहे. अचानक असे काय घडले की आजीने नातवाला घेऊन आयुष्य संपवले? आत्महत्या करण्यामागचे कारणं अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. रोहा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पंचनामा केल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे.

