• Tue. Mar 10th, 2026

    पाटील, मोहोळ यांच्याकडून आंदोलनांची पाठराखण, कुलकर्णी उठून गेल्या; भाजपच्या बैठकीत काय घडलं?

    पाटील, मोहोळ यांच्याकडून आंदोलनांची पाठराखण, कुलकर्णी उठून गेल्या; भाजपच्या बैठकीत काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2025, 3:18 pm

    तनिषा भिसे प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केलं होतं. यामध्ये भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी देखील सामील होती. भाजपा महिला आघाडीने फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच आंदोलन केलं नाही तर या सगळ्या प्रकरणात ज्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्यांच्या कुटुंबीयांच क्लिनिक देखील फोडलं होत. या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहीत आंदोलकांना समज द्यावी असं म्हटलं होतं. या पत्रानंतर भाजपमध्ये उघड दोन गट पडल्याचे पाहायला मिळालं. आता याचेच पडसाद भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील उमटल्याचे चित्र होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed