• Mon. Apr 14th, 2025 1:04:04 AM
    एकाच दिवसात दोन कुटुंबांनी आधार गमावला, एकाने जीव दिला तर दुसरा तलावात बुडाला, बीड सुन्न

    Beed Two Men Died: बीडच्या धावडी गावात एकच दिवसात दो तरुणांचा मत्यू झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून दोन कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    Lipi

    दीपक जाधव, बीड: बीड जिल्ह्यातील धावडी गावावर एकच शोककळा पसरली आहे. येथे एकाच दिवशी दोन तरुणांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे, तर दुसरा तरुण तलावात बुडाला आहे. तलावात बुडालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नसून गावकरी त्याचा शोध घेत आहेत. या दोन्ही घटना शनिवारी ५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.

    तरुणाने जीवनयात्रा संपवली

    अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रिंगरोड जवळील शेतामध्ये एका २५ वर्षीय युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. रामधन उर्फ करण अशोकराव नेहरकर (वय २५, रा. धावडी, ता. अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती आहे. त्याने शनिवारी (५ एप्रिल) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शहराबाहेरून जाणाऱ्या रिंगरोड लगत असलेल्या एका ढाब्याच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आयुष्याची अखेर केली. दरम्यान, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. त्याने आपला जीव का दिला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून सध्या पोलीस तपास सुरू आहे.

    तरुण तलावात बुडाला, अद्याप शोध सुरु

    धावडी येथील चौघे मित्र केंद्रेवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी या चार मित्रांपैकी एकजण खोल पाण्यात गेला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावाच्या पाण्यात बुडाला. अंकुर राजाभाऊ तरकसे (वय १८, रा. धावडी, ता. अंबाजोगाई) असं पाण्यात बुडालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे. तो पाण्यात बुडून २४ तास उलटून गेले तरी त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. सध्या गावकरी त्याचा शोध घेत आहेत.

    एकाच दिवसात गावातील दोन तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. तर या दोन्ही तरुणांच्या कुटुंबांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. तरुणा वयातील हे दोन्ही पोरं अशाप्रकारे गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *