• Thu. Apr 10th, 2025 12:28:44 AM

    निरोप समारंभाचं भाषण, वर्गाला खळखळून हसवलं, १२ व्या सेकंदाला बोलता-बोलता वर्षा कायमची कोसळली!

    निरोप समारंभाचं भाषण, वर्गाला खळखळून हसवलं, १२ व्या सेकंदाला बोलता-बोलता वर्षा कायमची कोसळली!

    Dharashiv Girl Student Dies during Farewell Speech : वीस वर्षीय वर्षा खरात हिचा निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    वर्षा खरात

    धाराशिव : निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने अवघ्या महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षा खरात असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

    वीस वर्षीय वर्षा खरात हिचा निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला. परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयात ही घटना घडली. या घटनेने महाविद्यालयासह शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाढते ऊन आणि दगदग यांच्या त्रासाने तिला प्राण गमवावे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

    वर्षाच्या भाषणात काय होतं?

    प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढा जमेल तेवढा अभ्यास करत असतो… असं बोलता बोलता तिने एक विनोद केला, ज्यावर अख्खा वर्ग खळखळून हसला. त्यानंतर शिक्षकांचं कौतुक करता-करता ती जागच्या जागी कोसळली.
    Nashik Accident : मोपेडचा आरसा डोक्यात घुसला, निवृत्त शिक्षकाची मदतीची याचना, हायवेवर सगळेच ‘बघे’ झाले, गुरुजींनी तडफडून प्राण सोडले

    निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करताना मुलीला आली चक्कर

    “आपल्या रा. गे. शिंदे कॉलेज परंडाची विद्यार्थिनी वर्षा खरात (राहणार नाडी) भाषण करत असताना तिला चक्कर आली आणि दवाखान्यात जाईपर्यंत ती मरण पावली. सर्वांनी काळजी घ्या ऊन खूप आहे, दगदग टाळा, आनंदी राहा, हे जीवन क्षणभंगूर आहे. भावपूर्ण श्रद्धांजली दीदी” अशा शब्दात नेटिझन्सनी सोशल मीडियावरुन वर्षाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
    Jalna Crime : सासूचा जीव घेणारी लेक आमच्यासाठी मेली, विहीणबाईंसोबत तिच्याही नावे पिंडदान, प्रतीक्षासोबत माहेरच्यांनी नातं तोडलं

    भाजलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू

    दुसरीकडे, नाशिकमधील अंबड येथील वर्षाबाई गोकुळ पाटील (वय ४१, रा. माऊली लॉन्स) यांनी ११ मार्च २०२५ रोजी राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतले. यात त्या गंभीर भाजल्या. त्यांना तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना चाळीसगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed