Ajit Pawar on Beed Governance- बीडमध्ये राष्ट्रवादी युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले आहेत.
अजितदादा काय म्हणाले?
इथं राख गोळा करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग सर्व गँगच आहेत. पण त्या गँग आता सुतासारख्या सरळ करायच्या आहेत. त्यात काही ईलाज नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकू नका. मी आज उत्पादन शुल्क विभागांच्या सचिवाला आणलेले आहे. काय काय करायचे त्याबद्दल येताना आमचं बोलण झाले आहे. मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो की तुम्हाला कळेल की मागच्या तुलनेत कामाची गती वाढली आहे. बीडमधल्या निगरगट्ट अधिकाऱ्यांना बदलाव लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, रस्ता नुसता मंजूर करून बील जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला. तो रस्ता दाखवावा लागेल. त्याचे फोटो कार्यकारी अभियंत्याला दाखवावे लागतील. त्यासंबंधी लाड अजिबात होणार नाही. जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे. पै न् पैचा हिशोब नीट लागला पाहिजे. मी पण पाच पैश्याचा कुणाचा मिंधा राहणार नाही.
कार्यकर्त्यांना कानपिचक्या
तुम्ही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. शाल घातली त्यातला कागद तसाच ठेवला जातो. हार आणला तर हाराची पिशवीही तशीच ठेवली जाते मी पहिली ती पिशवी उचलतो. मी पिशवी उचलायला सुरू केल्यानंतर म्हणतात नाही दादा राहुद्या, तुला मी उचले पर्यंत कळले नाही.तुझी अक्कल कुठे गहाण टाकली होती. शाली आणू नका, टोप्या घालू नका, हार घालू नका, येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल. जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. त्या हारचा बोजा आहे आपल्यावर असे वाटते.
आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने आमचं चांगल चालू आहेकर्म धर्म सहयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने आमचं चांगल चालू आहे, काही देऊ नका फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुम्ही नमस्कार करा.पायाही पढू नका, मी जाहीरपणे सांगतो की आजचे पुढारी हे पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत.ज्याच्या पाया पडता त्याचा इतिहास आठवा, मग म्हणाल मी कोणाच्या पाया पडलो. आई वडिलांच्या पाया पडा, गुरूंच्या पाया पडा. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आजाद, अण्णाभाऊ साठे असे असंख्य युगपुरूष आहेत. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक मोठी माणसं होती. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊ.