Raju Patil VS Rajesh More : मनसे आणि शिंदे गटामध्ये सोशलवॉर सुरु आहे. मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारत सोशल मीडियावर निशाणा साधला. यानंतर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आणि राजू पाटील यांच्यावर टीका केली.
आता यालाच राजू पाटील यांनी थेट स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून उत्तर दिले आहे. “मोरे साहेब आमदार झाल्याबरोबर निरुपमवर कारवाई करण्यासाठी तुमच्या जोडीने आंदोलन करणार, एप्रिल फुल”, असे म्हणत संजय निरुपम यांचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय. त्यामुळे मनसे आणि शिंदे गट यांच्यात सोशलवॉर होताना दिसत आहे.
Aaditya Thackeray : ‘हे तर एप्रिल फुल सरकार’, मुंबईकरांच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
राजू पाटील यांचा बॅनर चर्चेत
कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन्ही पलावा फुलांचे काम सुरू झाले. अनेक वर्षापासून हे काम सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप पुलाचे काम झाले नाही. आता मनसे नेते राजू पाटील यांनी सुरू असलेल्या पुलाच्या समोर भलामोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन 31 एप्रिलला स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार आहे, असे लिहिले आहे. एवढेच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल?… की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्स पोस्टच्या माध्यमातून राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

