• Wed. Mar 11th, 2026
    कौटुंबिक वादातून रक्ताच्या नात्याचा शेवट; पुतण्यानेच सख्ख्या काकाला संपवलं, कारण हैराण करणारं

    Buldhana Crime News : बुलढाण्यात सख्ख्या पुतण्याने काकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमोल सराफ, बुलढाणा : काका पुतण्यामध्ये सुरू असलेल्या वादाचा शेवट जीवघेणा होईल असा कोणी विचार केला नसेल, पण असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. रक्ताच्या नात्याचा दुर्दैवी शेवट झाला आहे. घरगुती वादातून पुतण्याने सख्ख्या काकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. गोपाल बोके आणि पुतण्या शुभम बोके यांच्यात घरगुती कारणावरून मोठा वाद होत होता. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. त्यानंतर राग अनावर झाल्याने पुतण्या शुभम बोके याने कुऱ्हाडीने वार करत काका गोपाल बोके यांच्या छातीवर वार करत त्यांचा यात मृत्यू झाला आहे.

    ही घटना शनिवारी, २९ रोजी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात सोनज इथे ही घटना घडली आहे. बुलढाणा पोलिसांनी याप्रकरणी शुभम बोके विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
    Crime News : बंद खोलीतून दुर्गंधी, दार तोडल्यानंतर बेडमध्ये सापडली बॉडी; ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत… काय घडलं?

    काकाने मृत्यू एक दिवस आधी पोलिसांत दिलेली पुतण्याची तक्रार

    महत्त्वाची बाब म्हणजे म्हणजे हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी, २८ मार्च रोजी काका गोपाल बोके यांनी पुतण्या शुभम शिवीगाळ करत असल्याची तक्रार नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पण या तक्रारीवर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. गोपाल बोके यांच्या या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर ही निर्घुण हत्या झालीच नसती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    गोपाल बोके यांचा पुतण्या विश्वजीत बोके आणि शुभम बोके, वय वर्ष ३० यांनी हत्या केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी शुभम बोकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
    Raigad News : शिमग्याचा कार्यक्रम आटोपून निघाले, पण नियतीच ठरली निष्ठूर; दोघांवर काळाचा घाला, संपूर्ण गाव हळहळले
    गोपाल बोके आणि त्यांचा पुतण्या शुभम बोके यांचे जुने वाद होते. अनेक वेळा यांच्यात शिवीगाळ, शाब्दिक वादावादी अशा घटना होत होत्या, पण कोणीही विचार केला नसेल की हा राग, हा वाद या नात्याचा शेवट करेल. पूर्ववैमन्सातून दोघांमध्ये मारहाण झाली आणि शुभमने काकाचा जीव घेतला.

    Buldhana News : कौटुंबिक वादातून रक्ताच्या नात्याचा दुर्दैवी शेवट; पुतण्यानेच सख्ख्या काकाला संपवलं, कारण हैराण करणारं

    काकाने आपला ट्रॅक्टर भाड्याने घेतला नाही?

    शुभमच्या काकाने त्यांच्या शेती कामासाठी भाड्याने त्याचा ट्रॅक्टर का घेतला नाही? या रागातूनच हा वाद घालत पुतण्याने काकाच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करून घरासमोर त्यांची हत्या केल्याची चर्चा आहे. पुतण्या शुभम हा इतरांच्या शेतातील कामं आपल्या ट्रॅक्टरने करून देत होता. पण काकाने पुतण्याचा शुभमचा ट्रॅक्टर न घेता दुसऱ्याचा ट्रॅक्टर घेत आपली शेतीचं कामं केली. याच रागातून त्याने ही हत्या केल्याचं चर्चेत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने  उपलब्धता करावी – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
    कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरी काँक्रिट रस्त्यासह येवला शहर बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तत्परतेने सादर करावा – मंत्री छगन भुजबळ    – महासंवाद
    जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed