• Fri. Mar 13th, 2026
    गौरीनं गळफास लावून घेतलाय! पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी राकेशचा बनाव; शेजाऱ्याला फोन, पण…

    Gauri Khedekar Murder: राकेश राजेंद्र खेडेकरनं (वय ३६) त्याची ३२ वर्षांची पत्नी गौरी अनिल सांबरेकरची २६ मार्चच्या रात्री हत्या केली. राकेश आणि गौरी बंगळुरुत वास्तव्यास होते. राकेशच्या कामानिमित्त दोघे बंगळुरुला शिफ्ट झाले होते.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: राकेश राजेंद्र खेडेकरनं (वय ३६) त्याची ३२ वर्षांची पत्नी गौरी अनिल सांबरेकरची २६ मार्चच्या रात्री हत्या केली. राकेश आणि गौरी बंगळुरुत वास्तव्यास होते. राकेशच्या कामानिमित्त दोघे बंगळुरुला (Bangalore Murder) शिफ्ट झाले होते. गौरीच्या हत्येनंतर राकेश रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून बोलत होता. तशी कबुली राकेशनंच पोलिसांना दिली. पोलिसांनी राकेशला गुरुवारी संध्याकाळी साताऱ्यातून अटक केली. त्यानंही जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

    २६ मार्चला राकेश आणि गौरी यांच्यात वाद झाला होता. राकेशच्या कामामुळे दोघे बंगळुरुला स्थायिक झाले. पण तिथे गेल्यावर गौरीला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते. राकेशसोबत बंगळुरुला आल्यामुळेच आपल्याला नोकरीशिवाय घरात बसून राहावं लागत असल्याची भावना गौरीच्या मनात होती. याच कारणावरुन दोघांचा वाद झाला. वाद टोकाला गेला आणि राकेशनं गौरीची हत्या केली.

    bangalore murder case

    गौरीची हत्या केल्यानंतर राकेश साताऱ्याच्या दिशेनं कार घेऊन गेला. तेव्हा त्यानं त्याच्याच इमारतीत तळमजल्यावर राहणाऱ्या प्रभू सिंह यांना फोन केला. गौरीनं जीव देण्याचा प्रयत्न केल्याचं त्यानं सिंह यांना सांगितलं. गौरीनं गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती तुम्ही पोलीस आणि घरमालकांना द्या, अशी सूचना राकेशनं प्रभू सिंह यांना दिली. यानंतर प्रभू सिंह यांनी लगेचच राकेशच्या घरमालकाला फोन केला. घडला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. गौरीच्या मृतदेहाची अवस्था पाहता तिनं आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

    राकेश खेडकर हिताची सिस्टिम्स इंडिया कंपनीत वरिष्ठ प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तो घरातूनच काम करतो. तर गौरीनं बंगळुरुला जाण्यासाठी नोकरी सोडली होती. बंगळुरुत गेल्यानंतर गौरीनं तिच्यासाठी काम शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिला मनासारखी नोकरी मिळाली नाही. राकेशनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, गौरी त्याच्याकडे सतत मुंबईला परत जाण्याचा हट्ट करत होती. त्यावरुन दोघांमध्ये सतत खटके उडत होते. Gauri Khedekar Murder : अगं गौरी, आपण नाही जाऊ शकत मुंबईला परत; बायकोने भांडी फेकली, राकेशला संताप अनावर, ‘त्या’ रात्री काय घडलं?
    गौरी आणि राकेश यांचा प्रेम विवाह झालेला होता. गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी आहे. दोघांच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. गौरी आणि राकेश यांचे स्वभाव पाहता त्यांचं पुढे जाऊन पटणार नाही, असं त्यांच्या कुटुंबियांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी लग्नाला विरोध दर्शवला. पण कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं होतं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed