• Sat. Jun 6th, 2026
    मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल २५५५ कोटी, कृषिमंत्र्यांची घोषणा

    ​​या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    farmer money2

    मुंबई : राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,५५५ कोटींची विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २,८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी दिली.

    या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कोकाटे यांनी म्हणाले.
    शिंदेंच्या फायरब्रँड आमदाराला राज्यमंत्रिपदाचा दर्जा, फडणवीसांनी जाहीर केलेल्या समितीचं प्रमुखपद
    विमा नुकसान भरपाईअंतर्गत खरीप आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी हंगाम २०२३-२४ साठी ६३.१४ कोटी आणि खरीप हंगाम २०२४ साठी २,३०८ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण २,५५५ कोटींचा लाभ चार लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसानभरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही कोकाटे यांनी सांगितले.
    राजे निवडणुकीपुरतेच; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे राजकारण्यांना खडे बोल
    आदर्श गाव योजना
    मुंबई:
    आदिवासी समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकारकडून आदर्श आदिवासी गाव योजना राबविण्यात येणार आहे. १३ जिल्ह्यांतील ५९ तालुक्यातील प्रतितालुका किमान एक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे यांची या योजनेसाठी निवड करण्यात येईल. गावांचा विकास करण्यासाठी पुढील दोन वर्षांपर्यंतचे नियोजन करण्यात येणार आहे.
    PM मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर; स्वागतासाठी भाजपची जंगी तयारी सुरु, कसा असेल दौरा?
    शेतकरी आत्महत्या
    यवतमाळ :
    सततच्या नापिकीमुळे कर्जाचा भार वाढल्याने महागाव तालुक्यातील घोणसरा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सखाराम सुभाष झोलांडे (३३) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. सखाराम यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. यातून उदरभरण करीत असतानाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा बँकेचे कर्ज थकले. उसनवारीही वाढली. हे सर्व कर्ज परतफेड करण्याची चिंता त्यांना सतावत असताना गुरुवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed