Nandurbar Burglary and Theft : नंदुरबारमध्ये चोरीच्या घटना सतत घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या एकाच रात्रीत १३ घरं फोडण्यात आली आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या शेजारीच शासकीय निवासस्थानं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या विविध इमारतींमध्ये कर्मचारी, तर काही अधिकारीदेखील राहतात. याच वसाहतीला चोरट्यांनी टार्गेट केलं. २३ ते २४ मार्च रोजी रात्री चोरट्यांनी या वसाहतीमधील चार इमारतीमधील तब्बल १३ घरं फोडली. एकाच रात्रीतून तब्बल १३ घरांची कुलूपं तोडण्यात आली. यामध्ये तापी इमारतीतील चार घरं, रंगावली तीन, गोदावरीमधील तीन, तर शिवण इमारतीत तीन घरांचं कुलूप तोडलं असल्याचं चित्र आहे. यातील ११ घरांमध्ये कोणीही राहत नसल्याने नुसतंच कुलूप तोडल्याचं दिसून आलं.
Nandurbar News : नव्या विहिरीचं खोदकाम जीवावर बेतलं, ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भयंकर घडलं; सारं गाव हळहळलं
मात्र, रंगावली या इमारतीत महिला बालकल्याणमध्ये परिचर म्हणून कार्यरत असलेल्या कविता यशवंत अहिरे राहतात. त्या नंदुरबार शहरातील पटेलवाडीमध्ये राहत असलेल्या त्यांच्या आईकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडत तब्ब्ल सव्वा लाखाहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे. तसंच एक मोबाईल, एटीएम कार्ड चोरट्यांनी चोरुन नेले आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कविता अहिरे यांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच एका घरातून लॅपटॉप चोरीला गेल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
Investment Tips : महिन्याला ५ हजारांची गुंतवणूक बनवेल करोडपती, कसं कराल सेव्हिंग? जाणून घ्या करोडोंचा फॉर्म्युला
याशिवाय एका घराबाहेरी दुचाकी (क्र.एमएच ३९ एई ३०२४) चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनास्थळी पोलीस पथकाने भेट दिली. तसंच श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या २०० मीटर अंतरावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच चोरीचा प्रयत्न झाल्याने येथील रहिवासी धास्तावले आहेत.
Nandurbar News : एकाच रात्री १३ घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; दरोड्यांमुळे नंदुरबारमध्ये खळबळ
पोलीस वसाहतीमध्येही झाली होती घरफोडी
तीन महिन्यापूर्वी नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीतील राहणाऱ्या पोलिसांच्या चार घरांमध्ये चोरांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी तब्बल चार घरं फोडली होती. यातील तीन घरातून चोरट्यांच्या हाती काहीही लागले नव्हतं. मात्र, एका घरातून ४ लाख २ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यामुळे पोलीसच असुरक्षित आहेत, अशी भावना व्यक्त होत आहे.

