Eknath Shinde On Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे. व्यंगही आहे. हे आम्हालाही कळतं. परंतु यालाही एक मर्यादा आहे. हे सगळं प्रकरण म्हणजे एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी सुपारी घेण्यासारखं आहे. कामराने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि काही उद्योगपतींसंदर्भात देखील वादग्रस्त व्यंग केले आहे.”
स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामराने रचलेल्या आणि सादर केलेल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षपार्ह गाण्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी याचा निषेध म्हणून, जिथे कामराने सादरीकरण केलं त्या अंधेरीच्या स्टुडिओची तोडफोड केली. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे. व्यंगही आहे. हे आम्हालाही कळतं. परंतु यालाही एक मर्यादा आहे. हे सगळं प्रकरण म्हणजे एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी सुपारी घेण्यासारखं आहे. कामराने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि काही उद्योगपतींसंदर्भात देखील वादग्रस्त व्यंग केले आहे.”
शिंदे पुढे म्हणाले की, कामरा जे करतोय ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तर तो कुणासाठीतरी काम करत असल्यासारखे आहे. स्टु़डिओची जी तोडफोड झाली त्याचं मी समर्थन करत नाही. मात्र कॉमेडीला एक लेव्हल असते. अन्यथा क्रियेला प्रतिक्रिया ही येतच असते. मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही. उलट शांत राहुन न्याय मिळवून देण्याचं काम करतो. असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधत, कामरावर कारवाई न करता स्टुडिओची तोडफोड करणं ही औरंगजेबी वृत्ती असल्याचे म्हटले आहे. कुणाल कामराचे समर्थन करत राऊत म्हणाले की, कामराने काही चुकीचं केलं नाही. गद्दाराला गद्दार म्हणणं काही चुकीचं नाही. या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामराने माफी मागण्यास मात्र नकार दिला आहे.