• Sun. Mar 15th, 2026

    जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 15, 2025
    जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद




    पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण

    यवतमाळ, दि.15 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील नऊ डेपोला प्रत्येकी 10 याप्रमाणे एकून 90 नवीन एसटी बसेस उपलब्ध होत आहेत. त्यापैकी यवतमाळ व उमरखेड या डेपोला आज प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या. यवतमाळ बसस्थानकावर या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते झाले. जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर आपला भर असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.

    राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी आहेत. ग्रामीण भागात अजूनही वाहतूकीचे प्रभावी साधन म्हणून बसकडेच पाहिल्या जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसेस जुन्या आणि अपुऱ्या असल्याने संपूर्ण जिल्ह्यालाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली होती. त्यामागणीस प्रतिसाद म्हणून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास 10 नवीन बसेस प्राप्त झाल्या. त्यातील पाच बसेस उमरखेड तर पाच बसेस यवतमाळ आगारास देण्यात आल्या आहे.

     

    यवतमाळ आगारास प्राप्त बसेसचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज आगाराच्या परिसरात झाले. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, आगार प्रमुख छगन दिवसे, यंत्र अभियंता नरसिंग चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी फित कापून एसटी बसेसचे प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण केले.

    एसटी महामंडळाची बस आज देखील ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे या वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आपले प्राधान्य आहे. परिवहन मंत्र्यांकडे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी मी सातत्याने केली होती. त्यामुळे आज नवीन 10 बसेस उपलब्ध झाल्या. जिल्ह्यातीस सर्व नऊ डेपोला प्रत्येकी 10 नवीन बसेस याप्रमाणे तब्बल एकूण 90 नवीन बसेस उपलब्ध होणार आहे. उर्वरीत बसेस लवकरच प्राप्त होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *